त्यामुळे या ठिकाणी गर्दीची परिस्थिती असेल, या अनुषंगानं या परिसरातल्या वाहतूकीत मुंबई पोलिसांकडून काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत. एम्ब्युलन्स, पोलिस वाहनं, अग्निशमन दलाची वाहनं तसंच महत्त्वाच्या व्यक्तींची वाहनं आणि सेवा पुरवणारी वाहनं वगळता, इतर सर्वांसाठी वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतूकीचा उपयोग करावा. स्वतःची वाहनं या ठिकाणी आणण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसंच कोस्टल रोड वरील उत्तर आणि दक्षिण वाहिनी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे, इथली वाहतूक प्रिंसेस स्ट्रिट मार्गावर वळवण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगला मनाई करण्यात आली आहे