मुंबई : वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहला शिवडी न्यायालयानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे 30 जुलैपर्यंत मिहीर शाहची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं, त्याला मुंबई पोलीसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं.
मिहिर शाह चालवत असलेल्या गाडीनं, प्रदीप आणि कावेरी नाखवा यांच्या गाडीला वरळीत धडक दिली होती. यात कावरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता.