नवी दिल्ल्ली : महाराष्ट्रात झिका विषाणूचे काही रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना झिका विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
गरोदर महिलांमध्ये झिका विषाणूची लागण झाल्यास गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकासावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे गरोदर महिलांमध्ये झिका विषाणूची लागण झाल्याबाबत खात्री करण्यासाठी चाचण्या करण्याची सूचना आरोग्य मंत्रालयानं केली आहे. मंत्रालयाचे आरोग्य सेवा संचालक डॉ. अतुल गोयल यांनी ही सूचनावली जाहीर केली. विषाणूची लागण झालेल्या महिलांच्या प्रकृतीवर आणि गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला मंत्रालयानं दिला आहे.
आरोग्य केंद्रं आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांवर लक्ष ठेवण्याची आणि परिसर डासमुक्त ठेवण्याची जबाबदारी एका अधिकार्यावर सोपवण्यास मंत्रालयानं सांगितलं आहे. ठराविक प्रकारच्या डासांमार्फत झिका विषाणूचा प्रसार होतो.
एकूण विषाणू पसरवणाऱ्या कीटकांपासून निवासी परिसर,कार्यालयं, शाळा, बांधकामाची ठिकाणी आणि आरोग्य संस्था मुक्त ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचनाही केली आहे.