Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल-रायगडच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी.


उरण दि १० ( विठ्ठल ममताबादे ) : पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनच्या सुयश पवारने वाको इंडिया सीनियर नेशनल किकबॉक्सिंग चँपियनशिप २०२४ ,इनडोअर स्टेडिअम ,म्हापसा ,गोवाच्या स्पर्धेत वाको महाराष्ट्र कोच व मुख्य प्रशिक्षक निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली किकलाईट -७४ किलोवजनी गटात सुवर्ण पदक पटकावले .

तसेच अनुज भोसले यांनी किकलाईट -८९ किलोवजनी गटात रौप्यपदक व लाइट काँटॅक्ट -८९ किलोवजनी गटात कांस्यपदक,चिराग शिवगण याने किकलाईट +९४ किलो प्रकारात रौप्यपदक , आर्यन शिवतरकर किकलाईट -९४किलो प्रकारात कांस्यपदक , फाल्गुनी दकोलीया लो-किक -४८किलो प्रकारात रौप्यपदक पटकाविले. तर हर्षदा मोकल हिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले .

या सर्व खेळाडूंचे वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि वाको महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलास व पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशन सचिव मंदार पनवेलकर यांनी खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies