उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) उरण पिरवाडी येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र तालुका उरण अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी उपस्थित लहान मुलांना चालू घडा मोडीत लहान मूल मुलींवर बलात्काराच्या घटना संदर्भात, तसेच महिलांवर होत असलेल्या अत्याचार , विनयभंग यातून बचावासाठी कसे स्वतः ला वाचवावे तसेच लहान मुलं मुलींना चांगला स्पर्श वाईट स्पर्श या विषयी माहिती दिली आणि कुणी वाईट स्पर्श केला तर स्वतः स्वतःचे रक्षण कसे करावे हे सांगीतले.
वनवासी कल्याण अश्राम जिल्हा हित्रक्षा प्रमुख मीरा पाटील यांनी वनवासी कल्याण आश्रम सांस्कृतिक जोड समाजातील सर्व घटकांना सोबत राहण्यासाठी रक्षाबंधन सण साजरा करीत असून रक्षाबंधन सण का साजरा केली जाते याची थोडक्यात माहिती सांगितली. नंतर मुलांना व मोठ्या माणसांना राख्या बांधून बिस्कीट वाटप केले. सहसचिव कुणाल शिशोदिया यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.यावेळी बेबीताई कातकरी,नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच हरेश कातकरी आदी मान्यवर उपस्थित होते.खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.