उरण शहरात कुत्रा चावण्याच्या घटनेत झाली वाढ. मात्र नगर परिषदेकडून कोणतेही उपाययोजना नाही.
नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण.
उरण दि २९ ( विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून उरण मधील विविध रस्त्यावर, चौकात, नाक्या नाक्यावर मोठ्या प्रमाणात कुत्रे उभे असलेले दिसतात. मात्र हे कुत्रे शांत न बसता येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना विनाकारण नाहक हा त्रास देत आहेत. तर उरण शहरातील अनेक नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा देखील घेतला आहे. उरण नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे उरण शहरा मध्ये नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनेत वाढ होत आहे अशी नागरिकांचे म्हणणे आहे.
उरण शहरातील देऊळवाडी शंकर मंदिर येथे तसेच कामठा रोड व कामठा परिसर, पालवी हॉस्पिटल परिसर आदी ठिकाणी कुत्रे मोठ्या प्रमाणात असून या कुत्र्यांना पकडून बाहेर कुठेतरी योग्य सुरक्षित स्थळी सोडून देण्यात यावे.व कुत्र्यांची नसबंदी करण्यात यावी जेणेकरून भविष्यात कुत्र्यांची संख्या वाढणार नाही अशी मागणी उरण मधील विविध नागरिकांनी केली आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते रवि गुरव यांनीही उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याकडे पत्र व्यवहाराद्वारे केली आहे.पत्रव्यवहार व नागरिकांची मागणी या गोष्टी कडे नगर परिषद कोणत्या भूमिकेतून बघते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
नागरिकांची मागणी व नागरिकांनी केलेले पत्रव्यवहाराची दखल नगर परिषद घेते की नाही या बाबत नागरिकांच्या नजरा नगर परिषदेच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.उरण शहरात एखाद्याला कुत्रा चावला. आणि त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.