मूक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना केले शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उप अभियंता धोंडीबा गोविंदा काटकर हे महापालिकेच्या तेहतीस वर्षाच्या प्रदीघ सेवेतून प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्त झाले.
या निवृत्त कार्यक्रमात येणाऱ्या सर्व मित्र मंडळींना काटकर यांनी विनंती केली होती, की मला कुठल्याही प्रकारच्या भेट वस्तू वा पुष्पगुच्छ आणू नये. अगदीच भेट द्यायची असेल तर शालेय उपयोगी वस्तू भेट द्या
आणि या सर्व भेट दिलेल्या शालेय वस्तू तसेच काटकर यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना वह्या आणि भेटलेल्या वस्तू उल्हासनगर येथील प्रज्ञा करुणा मूक बधीर विद्यालय येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या .
याप्रसंगी आयोजित स्नेह भोजन सोहळ्याप्रसंगी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच ठेकेदार आणि मित्रमंडळी नातेवाईक उपस्थित होते.