डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि केशव हासगुळे व अंमलदार हजर असतांना पोहवा. विशाल वाघ यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारने माहीती दिली की, दिनांक १६/०८/२०२४ रोजी २०:०० वा. ते २१:०० वा. दरम्यान दोन इसम नामे १) साहील लक्ष्मण बोराडे रा. साबेगाव, जिवदानी नगर, दिवा पूर्व २) प्रकाश गंगाधर जाधव, रा. साबेगाव, दिवा पूर्व हे सुका गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी नेहरू रोड, डोंबिवली पूर्व येथे येणार आहे. सदर खबरीबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे यांना माहीती दिली.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सपोनि अच्युत मुपडे यांनी बातमीच्या अनुषंगाने नेहरू रोड, डोंबिवली पूर्व येथे जावुन दोन पथक तयार करून सापळा रचला प्राप्त खबरीतील वर्णनाचे दोन इसम नेहरू रोडचे बाजुकडुन येताना दिसले, त्यातील एक इसम हातात कशाने तरी भरलेला एक कागदी बॉक्स घेवुन क्लॉथ सेंटरचे बोळीत पायी चालत येत असल्याचे दिसले. तेव्हा पोलीस पथकाने त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवले असता प्राप्त खबरीतील इसम तेच दोघे असल्याची खात्री झाल्याने सपोनि. मुपडे व पथकाने त्यांना चोहोबाजुनी घेराव घालुन पळण्याची संधी न देता २०:५० वाजता त्यांचे जवळील कागदी बॉक्ससह जागीच अटकावुन ठेवले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता प्राप्त खबरीप्रमाणे आपले नाव पत्ता सांगितले, त्यानंतर साहील लक्ष्मण बोराडे याच्या कडील बॉक्स उघडुन पाहीला असता त्यात प्लास्टीक पिशव्याच्या वेगवेगळया पाकिटामध्ये काळया हिरव्या रंगाचा सुका पानासारखा पदार्थ दिसुन आला. सदर बाबत दोघांणकडे विचारणा केली असता, त्यांनी गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि मुपडे यांनी पंचां समक्ष सोबत आणलेल्या इलेक्ट्रीक वजन काटयाचे सहायाने गांजा या पदार्थाचे वजन केले असता तो एकुण वजन २ किलो ६३८ ग्रॅम (कागदी बॉक्स व प्लॅस्टीक पिशवीसहीत) किंमत २५,०००/- रूपये असल्याचे आढळुन आले. सदर इसमांना व गांजा हा अंमली पदार्थ ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि नं. ७९७/२०२४ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) व २० (ब) प्रमाणे दिनांक १७/०८/२०२४ रोजी ००.४७ वा. गुन्हा दाखल करून सदर इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि. हासगुळे हे करत असुन या दोघांचा मा. न्यायालयाकडुन सदर आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेला आहे.
सदरची कारवाई सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण, सुहास हेमाडे सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोनि. पंकज भालेराव, सपोनिरी. अच्युत मुपडे, पोउनि. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, दत्तात्रय कुरणे, प्रशांत सरनाईक, शेखर कोळी, पोना. शरद रायते, दिलीप कोती, पोशि. सुनिल शिंदे, मंगेश वीर, निलेश पाटील यांनी केली आहे.