Type Here to Get Search Results !

वारकऱ्यांना परवडणारी घरे द्या,पेन्शन उत्पन्न मर्यादा वाढवा, मराठा सेवा संघ, ओबीसी प्रतिष्ठानची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


समता आणि मानवतेच्या वारीची गरज - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि.26 : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी आपल्याला समता आणि मानवता शिकवली आहे आजच्या पिढीला समृद्ध घडवण्यासाठी मानवते बरोबर समतेची ही गरज आहे त्यातूनच आपला महाराष्ट्र समृद्ध राहील असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी वारी समतेची वारी मानवतेची या कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

वारकऱ्यांना परवडणारी घरे मिळावीत,तसेच वारकरी पेन्शन योजनेकरिता असणाऱ्या उत्पन्न मर्यादेत वाढ करावी असे साकडे ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघ आयोजित वारी समतेची आणि वारी मानवतेच्या माध्यमातून समतेच्या वारीत सहभागी झालेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे.

काही कारणास्तव नागरिकांना आषाढी वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांना वारी अनुभवता यावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीवर ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघाने आयोजित या वारीत रविवारी पावसालाही अडथळा निंर्माण करता आला नाही. या वारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, फुले दांपत्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्यानंतर कोर्टनाका सर्कल येथे भर पावसात वारकऱ्यांचे गोल रिंगण तसेच अश्व रिंगण पार पडले या रिंगण सोहळ्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती आणि भक्ती संगम होऊन गुरु शिष्य भेट शिव कलाकार डॉक्टर सागर फापाळे यांनी साकारली. पंढरपुरात येथे होणाऱ्या गोल रिंगणाची आठवण यानिमित्ताने झाल्याचे या वारीत सहभागी झालेल्यांची सांगितले. त्यामुळे ठाण्याची देखील प्रति पंढरपूर झाले अशी प्रतिक्रिया काही वारकऱ्यांनी दिली. तर हा आनंद सोहळा ठाण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये भर टाकणारा असून समतेची वारी दरवर्षी झाली पाहिजे अशी देखील भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या वारीत सहभागी झाले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वारकऱ्यांनाही परवडणारी घरे मिळावीत आणि वारकऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन योजनेची उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

या वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप भानुदास मोरे देहूकर यांचे किर्तन झाले. या वारीत छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी संप्रदायातील संत, महात्मे यांची वेशभूषा केलेले कलावंत सहभागी झाले होते, असे ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रफुल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी सांगितले.

एनकेटी महाविद्यालयाचे विश्वस्त आणि समाजरत्न नानजीभाई ठक्कर यांचे विशेष सहकार्य या सोहळ्यास लाभले. या सोहळ्यात ठाणे खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याध्यक्ष तथा नगर अभियंता मुंबई महानगरपालिका नवनाथ घाडगे, जल अभियंता खराडे आणि काकडे, निवासी जिल्हाधिकारी संदीप माने, ठामपा उपायुक्त शंकर पाटोळे, ठाणे महानगरपालिकेचे माजी सभापती राम रेपाळे, मा. नगरसेविका मृणाल पेंडसे, मा. नगरसेविका कविता पाटील, माजी परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव मुळूक, युवा सेनेचे नितीन लांडगे, निखिल बडजुडे, ह भ प विलास महाराज फापाळे, भारतीय सेनेतील राजू पाटील, जयदीप भोईर यांच्यासह सैनिक फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, यादव समाज ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र यादव, रामानंद यादव, रामाश्रय यादव, राम यादव, लोहार समाजाचे बळीराम खरे, शिवसेनेचे राजेंद्र देसाई आणि ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

या सोहळ्यात ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील वारकरी महिला, पुरुष आणि बाल वारकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिंब पावसात भिजत टाळ-मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात रिंगण फेरा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, जगतगुरू संत तुकाराम, विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभुषेत वारकरी सजले होते. तर तर नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठाणेकरांनीही मोठी गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies