जीबीके प्रतिष्ठान व रोझ फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्त साडी भेट
अंबरनाथ दि. १९ ( नवाज वणू ) : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. ते थेट तिच्या खात्यात जमा केले जात आहेत. राज्यभरातून लाखो महिला नोंदणी करण्यासाठी कार्यालयाबाहेर रांग लावून अर्ज भरताना दिसत आहेत.
दरम्यान या योजनेस पात्र महिलांना अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टी, गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान तसेच रोझ फाउंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्व बि-केबीन रोड येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात भाजप कल्याण जिल्हा सचिव अभिजीत करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पूर्व संध्येला हजारो महिला, अंध, अपंग महिलांना भाजप प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्याहस्ते साडी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी अपंग बांधवांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले.
'मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेस पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करून बहिणीला राखी पौर्णिमेची ओवाळणी देण्याची घोषणा नव्हे तर प्रत्यक्षात खात्यात रक्कम जमा करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव अभिजीत करंजुले पाटील व जनसेवक विश्वजीत करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून अंबरनाथमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या महिलांना भारतीय जनता पार्टी, गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोझ फाउंडेशनच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन पूर्वसंध्येला भाजप जनसंपर्क कार्यालयात भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्याहस्ते महिलांना साडी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी युवती प्रदेश सचिव रूपाली लठ्ठे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सुजाता भोईर, अल्पसंख्यांक सेलच्या रोझलीन फर्नांडिस,रीना मोरे, सुनिता लयाल, पूजा रणदिवे, श्रद्धा गुंजाळ, लक्ष्मी राजपूत, अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष सर्जेराव माहुरकर, पश्चिम मंडळ अध्यक्ष दुर्वेश राणा, भाजपचे दिलीप कणसे, आप्पा कुलकर्णी, दत्ता देशमुख, संदीप विशे, साईनाथ गुंजाळ, लक्ष्मण पंत, श्रीकांत रेड्डी,राजू गायकवाड, राजेश सिंग, प्रवीण महाजन, अनुराग आचार्य आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप महिलांच्या रक्षणासाठी कटिबद्ध ! -- गुलाबराव करंजुले पाटीलमहाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी भगिनींच्या खात्यामध्ये थेट पंधराशे रुपये जमा होतात. ते कुठेतरी अधिकारी किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात जात नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गळती राहणार नाही. महिना पंधराशे रुपये शासनाने दिले, परंतु आज भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोझ फाउंडेशनच्या वतीने या आमच्या लाभार्थी भगिनींना रक्षाबंधन पूर्व संधीला साडी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सणाला प्रत्येक कुटुंब नवीन साडी घेऊ शकत नाही, घेऊ शकते असे असताना सगळ्या भगिनींना साडी भेट देण्याचे ठरवलं. विशेष म्हणजे या रक्षाबंधन सणाचे वैशिष्ट्य असं आहे की, भावानं बहिणीचे रक्षण करावं, त्यांनी आम्हाला राखी बांधली आहे, भारतीय जनता पार्टी सदैव महिलांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. अशी भावना व्यक्त करत भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांनी साडी भेट देताना सर्व महिला भगिनींना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या.