कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आज खासदार नारायण राणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. क्रांती दिनानिमित्त स्थानकाच्या आवारात, नव्याने उभारलेल्या १०० फुटी ध्वज स्तंभावर नारायण राणेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विंदांची राणीची बाग या बाल उद्यानाचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.
आपल्या जिल्ह्याचा विकास होत असताना रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण व्हावे ही आनंदाची बाब आणि मी समाधानी आहे अशी प्रतिक्रिया यावेळी नारायण राणेंनी दिली