उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) बी. एम. टी. सी कामगारांच्या ४० वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बी.एम.टी. सी कामगारांनी ९ ऑगस्ट २०२४ रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिला होता. सिडको महामंडळाची तत्कालीन बीएमटीसी परिवहन सेवा काही अधिकारी, कर्मचारी आणि तत्कालीन राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे देशोधडीला लागली. त्यानंतर ४० वर्षापासून या कामगारांचा लढा सुरूच आहे. बीएमटीसी कामगारांना सिडकोकडुन १० बाय १० चे एकञित भुखंड तसेच थकीत नुकसानभरपाई मिळेल असा निर्णय १० जुलै २०१३ रोजी झाला होता.
सिडको मुळे १८०० कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे.नवी मुंबई शहराची निर्मिती करताना १९७४ मध्ये बीएमटीसीची दादर ते पनवेल अशी पहिली बससेवा सुरू झाली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यानंतर टप्याटप्याने २७० हून अधिक बस वाशी, घणसोली, ऐरोली, रबाले, ठाणे आणि बेलापूर या परिसरात धावत होत्या. तत्कालीन राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे ९ फेब्रुवारी १९८४ मध्ये ही बससेवा बंद पडल्याने १८०० कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळली. प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दि. बा पाटील साहेब यांच्याकडे बीएमटीसी कामगारांनी न्याय देण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी प्रशासनाची व कामगारांची सखोल माहिती असणारे नेते म्हणुन ही जबाबदारी कामगारनेते दिवंगत शाम म्हात्रे साहेब यांच्यावर सोपवली असता या कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना नवी मुंबईत १० वाय १० चौरस फुटाचे एकञित भुखंड देण्याचा ऐतिहासिक ठराव दिवंगत शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडको संचालक मंडळाने १० जुलै २०१३ रोजी घेतला. दिवंगत शाम म्हात्रे साहेब यांच्या निधणानंतर त्यांची कन्या कु. श्रुती शाम म्हात्रे यांनी हया कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन नगविकासमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी वेळोवळी बैठका करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. सिडको महामंडळाकडुन सर्व कामगारांना गाळे देणाचा प्रस्ताव देखील फेटाळला गेला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळयाची उपलबद्धता होऊ शकणार नाही या कारणाने एकञित भुखंड देण्याच्या प्रस्तावावर सिडको महामंडळ व महाराष्ट्र शासन तसेच बीएमटीसी कामगारांचे शिष्टमंडळ यांच्या मध्ये गेल्या अडीच वर्षापासून चर्चा सुरू असुन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वेळोवेळी बीएमटीसी कामगारांचे शिष्टमंडळ यांच्या मागणीबाबत अवगत करत असुन देखील आज रोजी सिडकोकडुन बीएमटीसी कामगारांच्या सार्थ मागणीचा प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यास दिरंगाई होत असल्याने बीएमटीसी कामगार तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शुकवार दि.०९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शुकवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी बी. एम. टी. सी कर्मचारी पुनर्वसन समिती द्वारे होणाऱ्या या ऐतिहासीक आंदोलनाच्या निमित्ताने कामगारांच्या एकजुटीला आव्हान म्हणुन ४० वर्षापासून हया देशोधडीला लावलेल्या कामगारांना ग्रहन म्हणुन काही राजकीय नेते त्यांचा वेडा प्रयत्न त्याठीकाणी मुठभर लोकांना घेऊन करत आहे .परंतु यावेळी बी. एम. टी. सी कामगार कोणत्याही राजकीय बडया नेत्याच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता स्वतः ताकदीने सिडको गेट समोर ९ ऑगस्ट रोजी उतरणार असल्याचा सर्व कामगारांचा ठाम निश्चय आहे. तसेच दिवंगत दि. बा. पाटील साहेब तसेच दिवंगत शाम म्हात्रे साहेब यांचे प्रकल्पग्रस्त बीएमटीसीचे अधुरे राहीलेले स्वप्न पुर्ण करण्याचा श्रुती म्हात्रे यांचा देखील ठाम निश्चय आहे.