Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- उमेद जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत बँक लिंकेज संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न


ठाणे : आर्थिक वर्ष २०२४-२५ या कालावधीत जास्तीत जास्त पतपुरवठा (बॅंक कर्ज) उपलब्ध करून देणे, ऑनलाइन बँक लिंकेज करणे ही प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा अग्रणी बँक, वागळे इस्टेट येथे सर्व बँक व्यवस्थापक व उमेद कर्मचारी यांची आज, दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवशीय कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली.

या कार्यशाळेची सुरुवात दिपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्तविक प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा सह जिल्हा अभियान संचालक एमएसआरएलएम, छायादेवी शिसोदे यांनी केले. तसेच राष्ट्रीय संसाधन प्रशिक्षक (NRP) खान्डेराव दिक्षित यांनी कार्यशाळेचे प्रशिक्षण दिले. गटाचे बँक लिंकेज NRLM MIS पोर्टलवर ऑनलाइन प्रक्रिया करणे व आर्थिक वर्ष २०२४-२५ या कालावधीतील आर्थिक व भौतिक लक्ष साध्य करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षणादरम्यान उद्भवलेल्या शंकांचे निरस जिल्हा व्यवस्थापक - आर्थिक समावेशन प्रतिक्षा आगीवले यांनी केले.

एनआरएलएम मध्ये आर्थिक समावेशन उपक्रम एनआरएलएम च्या समूहांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर, प्रभावी आणि पारदर्शक आर्थिक सेवा प्रदान करतात, तसेच जीवन संरक्षण आणि वृद्धापकाळसाठी संरक्षणात्मक कवच प्रदान करते. स्वयं सहाय्यता समूहांचे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत स्वयं सहाय्यता समूहांना विविध बँकेद्वारे बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो उपलब्ध झालेल्या कर्जाचा वापर करून महिला प्राथमिक गरजा पूर्ण करतात तसेच व्यवसाय सुरू करतात. आर्थिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ पर्यंत एकूण २५९८० स्वयंसहाय्यता समूहांना ७५८९६.६७ (लक्ष) बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

उमेद अंतर्गत विविध अभिनव उपक्रम गावस्तरावर राबविले जात आहेत. स्वयंसहाय्यता समूहांना व्यवसायामध्ये वृद्धी निर्माण करणेसाठी विविध बँकांच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दरातून कर्ज पतपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. बँक व्यवस्थापक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण मध्ये आर्थिक समावेशन बाबत मार्गदर्शन करण्यात आले, Online बँक प्रस्ताव सादर करण्याचे प्रशिक्षण, PMJJBY, PMSBY, अटल पेन्शन योजना, आरोग्य विमा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, सुमतीबाई सुकाळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना, मुद्रा कर्ज योजना, आणि वैयक्तिक उद्योग व्यवसायाकरिता मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ठाणे सोनाली देवरे, जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक अभिषेक पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक (MSRLM) सारिका भोसले, तसेच जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापक, सर्व MSRLM चे अधिकारी, प्रभाग समन्वयक, माविम कर्मचारी व सर्व बँक सखी आदि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सदर प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले व जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन प्रतिक्षा आगीवले यांनी केले. कार्यशाळेचा समारोप सारिका भोसले यांनी सर्वांचे आभार मानून केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |