वीज सेवा सुरळीत करण्याचे व ग्रामस्थांचे समस्या सोडविण्याचे महावितरण प्रशासनाकडून आश्वासन.
उरण दि २१ ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पूर्व विभागात सारखी दररोज वारंवार वीज जाते. एकदा वीज गेली की १२ ते १३ तास वीज येत नाही. विजेच्या अनेक विविध समस्या आहेत. त्या समस्यावर उरण पूर्व विभाग मित्र परिवार तर्फे वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. लोकशाही व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला मात्र तरीही पूर्व विभागात वारंवार सारखी वीज जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे उरण पूर्व विभाग मित्र परिवार तर्फे सामाजिक कार्यकर्ते व उरण पूर्व विभाग मित्र परिवाराचे प्रमुख गोरख ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मधील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी उरण पूर्व विभाग मित्रपरिवार ह्या ग्रुप ने ठरवल्या प्रमाणे एमएसईबी ऑफिस उरण येथे धडक दिली. संबंधित अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे ह्यांची उरण पूर्व विभाग मित्र परिवारच्या पदाधिकारी सदस्यांनी भेट घेतली. व त्यांना ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करावे अशी मागणी केली. त्यासाठी पत्रक सुद्धा देण्यात आले.व उरलेली व मंजूर झालेली कामे गणेशोत्सव पूर्वी त्वरित करावीत अशी मागणी करण्यात आली.पुढील कामे हे किती दिवसात पूर्ण करणार ह्याचे लेखी पत्रक पदाधिकाऱ्यांनी मागितले. तेंव्हा अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांनी लेखी पत्र देण्याचे कबूल केले.वीज सेवा सुरळीत करण्याचे व ग्रामस्थांचे समस्या सोडविण्याचे महावितरण प्रशासनाकडून संदीप चाटे यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.RDSS व SSMR योजनेत मंजूर झालेली काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती त्याचे पत्रक उद्या पर्यंत मिळणार आहे. आणि काम कधी पर्यंत पूर्ण होईल हे ह्या पत्रात नमूद केलेले असेल अशी माहिती गोरख ठाकूर यांनी दिली.
ह्या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, सुधाकर पाटील , गोरख ठाकूर, प्रांजल पाटील, संजय ठाकूर, निशांत ठाकूर, हेमंत ठाकूर, विश्वनाथ घरत, मिलिंद भगत, विनोद पाटील, हितेश पाटील, अनिकेत ठाकूर, पराग ठाकूर, चेतन ठाकूर, कुमार ठाकूर, अमित म्हात्रे, प्रितम म्हात्रे, संग्राम पाटील(ग्रामपंचायत सदस्य वशेणी), राजेंद्र पाटील व विभागातील इतर तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते