डोंबिवली ( विनोद वास्कर ) : मेट्रोच्या कामामुळे बुधवारी सकाळी विद्यानिकेतन शाळेच्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य शासनावर टीका केली आहे.
आमदार राजू पाटील म्हणाले, प्रशासन बहिरं झालंय हे माहिती होतं पण आता आंधळंही झालंय वाटतं. कारण नागरिकांच्या समस्या दिसतचं नाही आहेत. वारंवार निदर्शनास आणून सुद्धा मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या ट्रॅफिकच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचा मात्र आजही कानाडोळा आहे. हे आजचंचं घ्या, ट्रॅफिक समस्या एवढी वाढलेय की शाळेच्या मुलांना सुट्टी जाहीर करावी लागली. हे असच सुरु राहिलं तर आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य ट्रॅफिकमध्येचं जाणारं वाटतं. उद्या जर आमच्या कल्याण डोंबिवलीकरांवर कोणती मेडिकल ईमरजन्सी आली तर त्या नातेवाईकांना करायचं काय? हाच जर मंत्र्याच्या रहदारीचा रस्ता असता तर बहुतेक ट्रॅफिकची समस्या झाली नसती. पण ही काय सर्वसमान्य जनता आहे. जनतेला गृहीत धरणं थांबवा आता ! असा टोला त्यांनी लगावला