डोंबिवली ( शंकर जाधव ) : जिमखाना मॉर्निंग वॉक आणि योगा ग्रुपने जिमखाना रोड डोंबिवली पूर्व येथील एसटी बस स्टँड च्या परिसरात वृक्ष रोपण केले.यावेळी सर्व सदस्यांनी उपस्थिती दर्शविली होती. शिवसेना कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील व ज्येष्ठ सहकारी अण्णा राणे यांनीही उपस्थिती दर्शविली होती.
याप्रसंगी महेश पाटील यांनी वृक्ष रोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केल्यानंतर सर्व सभासदांनी वृक्षरोपण केले. अरविंद सुर्वे, प्रदीप पाटील, समाजसेवक यांनी सहकार्य केले. इतर सभासदांनी देखील मदत केली. या नंतर सगळ्यांनी मिळून मैत्री दिन साजरा केला. सभासदांनी आपापल्या घरातून काही खाऊ आणला होता त्याचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.