डोंबिवली ( शंकर जाधव ) : आगामी कल्याण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे कल्याण तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांनी इच्छुक असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण ग्रामीण भागात लोकांच्या समस्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सोडवत आहे. यावेळी पक्षाने मला उमेदवारी दिली तर नक्कीच निवडणून येईन असा विश्वास व्यक्त केला.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे सुभाष भोईर यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर मनसेचे प्रमोद ( राजू ) पाटील यांनी निवडणूक लढवून विजयी झाले. 2024 ला आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून मला उमेदवारी दिल्यास नक्कीच निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला. तालुकाप्रमुख महेश पाटील म्हणाले ल, गेली दहा वर्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण मधील जनतेच्या समस्या सोडवित आहे. महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने नेहमी जनतेची सेवा करत त्यांच्या समस्या सोडवित आहोत.
दरम्यान, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर शिवसेनेने उमेदवार दिल्यास महेश पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आहे असे शिवसैनिक म्हणत आहे.