उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात गोपाळकाला सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
विविध गोविंदा पथक उरण मध्ये कार्यरत आहेत त्यापैकी शिवस्वराज्य गोविंदा पथक कोप्रोली हे नामवंत गोविंदा पथक असून शिवसेना द्रोणागिरी शहराची या वर्षाची दहीहंडी शिवस्वराज्य गोविंदा पथक कोप्रोली यांनी फोडली.
यावेळी द्रोणागिरी शिवसेना शाखेतर्फे गोविंदा पथकाचा सन्मान करून त्यांना बक्षीस देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, द्रोणागिरी शाखा प्रमुख जगजीवन भोईर यांच्यासह द्रोणागिरी शिवसेना शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.