उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : आजचे जग प्रचंड वेगात जात असले तरी युगानुयुगे गाव संस्कृती आजही जपली जात आहे,त्याचे मुख्य कारण गावातील लहान मोठ्या संस्था आपल्या कार्यातून संस्कृतीचे जतन करित असतात.असे विचार इतिहास संशोधन संपादकीय मंडळ वशेणीने आयोजित केलेल्या जनसेवा युक्त पारितोषिक वितरण समारंभात रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी मांडले.
यावेळी शर्मिला गावंड,निर्मला , प्रसाद पाटील,सुनील ठाकूर , गजानन गावंड, तानाजी मांगले,बच्चा मल्लिकार्जुन,अजय शिवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक मच्छिंद्र म्हात्रे आणि सूत्रसंचालन विजय म्हात्रे यांनी केले.
समाजामध्ये सेवा करणाऱ्या अजय शिवकर, प्रसाद पाटील, अंजना पाटील,प्रकाश पाटील, विजय म्हात्रे, परशुराम गावंड, ह.ना.ठाकूर जनसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्य स्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत १११ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी ११ विजयी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.तालुक्यातील १५ शाळांना फिनेल कीटांचे भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच गावातील गुणी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.वशेणी गावात स.रा.पाटील यांच्या सभामंडपात मोठ्या उपस्थितीत आणि मोठ्या उत्साहात सदर कार्यक्रम संपन्न झाला.