डोंबिवली ( शंकर जाधव ) : सालाबाद प्रमाणे यंदाही डोंबिवली पश्चिम (गावदेवी-नावागाव), देविचा पाडा, राहुल नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राहुल नगर मित्र मंडळच्या वतीने आयोजित सराव दहीहंडी मोहोत्सवाला गोविंदा पथकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, सुमारे ७० गोविंदा पथके ह्या मोहोत्सवात सामील झालेली पहायला मिळाली. महिला गोविंदा पथके आणि त्यांनी रचलेले दहीहंडीचे चक्री थर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. सर्व गोविंदा पाथकांना सन्मान चिन्ह व प्रथमोपचार किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा ) शिंदे , १४३ डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी , प्रदेश व जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन भोईर, युवक जिल्हाध्यक्ष तुषार म्हात्रे, डॉक्टर्स सेल जिल्हाध्यक्ष डॉ.विनय पाटील, कल्याण ग्रामीण अध्यक्ष ऍड. ब्रम्हा माळी, युवक जिल्हा उपाध्यक्ष योगेश म्हात्रे,राहुल नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश म्हात्रे, शिवसेना भाजप मित्र पक्षातील डोंबिवलीतील मान्यवर व उद्योगपती उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली चे युवक अध्यक्ष शशिकांत म्हात्रे व युवक जिल्हा सरचिटणीस निमेश पाटील यांनी केले.