उरण दि १९ ( विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे २१ वी ट्रेडिशनल बेल्टरेलिंग व मास रेसलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्या स्पर्धेमध्ये विविध वजन गटात उरण तालुक्यातील(पाणदिवे क्लास )रेसलिंग पट्टूनी पदके पटकविली.श्लोक योगेश ठाकूर गोल्ड मेडल, आर्यन अमर पाटील सिल्व्हर व ब्रॉन्झ मेडल, दीप धणेश्वर म्हात्रे दोन गोल्ड मेडल, वैदेही घरत सिल्व्हर मेडल,रोहित शरद घरत दोन गोल्ड मेडल, गोपाळ दिनकर म्हात्रे गोल्ड मेडल पटकाविले.
तसेच या सर्वांची निवड जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ट्रेडिशनल स्पर्धेसाठी झाली आहे. यांना शिहान राजू कोळी, गोपाळ म्हात्रे, राकेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.सदर स्पर्धा संतोष कवळेसर यांनी आयोजित केली होती. सदर विजयी सर्व उमेदवारांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.