डोंबिवली ( शंकर जाधव ) : बंद घरातील देवघरासाठी असलेल्या हॉलमधील खिडकी उघडून घरात प्रवेश करून चोरट्याने हॉल मधील लोखंडी कपाटातील 1,64,000 हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरले. हि घटना 24 जुलै रोजी डोंबिवली पूर्वेकडील तुकाराम नगर, आयरे रोड, अन्नपूर्णा पूजा बिल्डिंगमध्ये रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी चोरट्याला अटक करून गजाजाड केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश चंद्रकांत मोरे ( २३, रा. रूम नं.४०४, दत्तनगर वसाहत, दत्तनगर, डोंबिवली पूर्व) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत असताना आजूबाजूकडील सिसिटीव्ही कॅमेरे तपासले. यात चोरटा कैद झाला असून पोलीस त्याचा शोध करत होते. पोहवा विशाल वाघ यांना मिळालेल्या माहितीवरून 18 ऑगस्ट रोजी पो.उ.निरी केशव हासगुळे, पो.हवा वाघ यांनी आकाशला पकडले. आकाशकडील चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
सुहास हेमाडे, सहायक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग ) सुहास हेमाडे, डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि गणेश जवादवाड,पो.नि.(गुन्हे)/पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरी.केशव हासगुळे, पोहवा विशाल वाघ, पोहवा सचिन भालेराव, पोहवा प्रशांत सरनाईक, पोहवा दत्तात्रय कुरणे, पोहवा लोखंडे, पोना कोळेकर, पोना दिलीप कोती, पोशि देविदास पोटे, पोशि शिवाजी राठोड, पोशि मंगेश वीर यांनी सदर कामगिरी बजावली.