Type Here to Get Search Results !

शिळफाटा - महापे मार्गावर कचऱ्याच्या ढीगाऱ्याचे साम्राज्य, पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष !



ठाणे : दहा दिवस पूर्ण होऊन सुद्धा शिळफाटा ते महापे हे मार्गावर कचऱ्याचा ढिगारा ठाणे महानगरपालिकेने उचलला नाही. नागरिकांनी तक्रारी देऊन सुद्धा ठाणे महानगरपालिका शिळफाटा महापे मार्गावर एचपी पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेला कचराचा ढिगारा उचलत नाही आहे. अधिकारी आज उचलतो, उद्या उचलतो असे उत्तर देत असतात पण खरंतर कचरा उचलत नाही. अशा कामचोर अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवा असे प्रवासी,वाहन चालक आणि परिसरातील नागरिक मागणी करत आहेत.

नोकरीला लागण्या अगोदर आम्ही समाजासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहोत अशी उत्तर देत असतात पण खरंतर असे त्यांच्याकडून काम होत नाही. अशा कामचोर अधिकाऱ्यांना घरी बसवायला हवे . या कचरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रोगराई पसरू नये यासाठी वारंवार तक्रार करून सुद्धा अधिकारी दखल घेत नाही. दहा दिवस पूर्ण होऊन सुद्धा अधिकारी कानाडोळा करत आहेत. ठाणे आयुक्त अशा कामचुकार अधिकाऱ्यांना सबक शिकवणार का ?

डायमंड आपारमेंट, हानिया अपार्टमेंट, अस्मा अपार्टमेंट या बिल्डिंग वाले कचरा टाकत आहे वारंवार कचरा टाकणारा सूचना देऊन सुद्धा ऐकत नाही. आणि कचरा टाकणार तुम्हाला काय करायचे ते करा असे ते म्हणत आहे. तसेच या रस्त्यावर असणारे व्यावसायिक मटन वाले, चिकन वाले, हॉटेल वाले, भाजीवाले, फळ विक्रेते पान टपरी वाले, कचरा टाकत आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे तसेच यांच्याकडून दंडही वसूल करण्यात यावे. अशी मागणी भाजप कल्याण विधानसभा सुपर वॉरियर्स विनोद वास्कर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies