Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

प्रकल्पाला विरोध नाही, मुलभूत सुविधासाठीचा भूखंड सोडून प्रकल्प राबवा अन्यथा आंदोलन करू : निळजे गावतील बैठकीत गावाकऱ्यांची भूमिका



डोंबिवली ( शंकर जाधव) :  निळजे पाडा व निळजे गाव या दोन्ही गावातील आरोग्य केंद्र ,दोन क्रीडांगणे, स्मशानभूमी,अमृत योजनेतून उभारण्यात येत असलेले पाण्याचे जलकुंभ आदीवर वरवंटा फिरवला जाणार आहे.100 एकर हून अधिक गुरचरण जमीन मेट्रो कार शेड साठी संपादित केली जाणार आहे. यावर आपली भूमिका मांडण्यासाठी गावाकऱ्यांची निळजे गावातील ज्येष्ठ नागरिक भवन येथे बैठक पार पडली. प्रकल्पाला विरोध नाही, मुलभूत सुविधासाठीचा भूखंड सोडून प्रकल्प राबवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.


या बैठकीसाठी गजानन मांगळूरकर, माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, माजी सरपंच रविंद्र पाटील, प्रकाश पाटील, विश्वनाथ रसाळ, भगवान पाटील,गिरी धर पाटील, भगवान भोईर,चिंतामन भोईर, राम पाटील, यशवंत पाटील, राहुल भोईर, बळीराम भोईर, बाबुराव पाटील, महेश पाटील, धनाजी पाटील, मुकुंद पाटील, नंदू खंडाळे,हेमंत भोईर, रमेश पाटील, बाळाराम शंकर पाटील, भरत पाटील, संजय गायकर यांसह अनेक गावकरी उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच रवींद्र पाटील म्हणाले, सार्वजनिक सोयी सुविधा साठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावरील दोन क्रीडांगणे, प्राथमिकआरोग्य केंद्र ,स्मशानभूमी आदी सामाजिक हिताच्या मूलभूत सुविधां असलेल्या १५ एकर भुखंडाची जमिन ग्रामस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनार्थ असल्याने शासनाने मेट्रो प्रकल्पासाठी या जमिनी ताब्यात घेऊ नये. शासनाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र गावातील सार्वजनिक नागरी हिताच्या मूलभूत सुविधांचां विचार करून प्रकल्प राबवावा.


माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, स्वातंत्रोत्तर काळापासून गावठाण विस्तार करण्यात आला नसतानाही निळजे पाडा आणि निळजे गावं या दोन्ही गावात असलेली शेकडो एकर गुरचरन जमीन ग्रामस्थानी कोणत्याही अतिक्रमणाशिवाय राखून ठेवली आहे. मागील ७० वर्षाच्या कालावधीत मोकळ्या असलेल्या या गुरचरण जमिनीवर ग्रामस्थानी सहजपणे अतिक्रमण करून इ‌मारती उभारू शकले असते.मात्र आम्ही ते केले नाही, म्हणूनच आज हि जमीन मोकळी जागा सहजपणे उपलब्ध झाली आहे.गजानन मांगळूरकर म्हणाले, एमएमआरडिएच्या मेट्रो -१२ प्रकल्पाच्या मेट्रो यार्ड कारशेडसाठी निळजे आणि निळजेपाडा ह्या दोन्ही गावाच्या ह‌द्दितील सुमारे शंभर एकर गुरुचरण जमीन शासनाने एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मेट्रो यार्ड साठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीवर सद्यस्थितीला या भूखंडावर दोन क्रीडांगण, आरोग्य केंद्र, स्मशान भूमी, पाण्याच्या टाक्या आदी नागरी सुविधा असल्याने या प्रकल्पात बाधित होणार आहे. क्रीडांगणे व सार्वजनिक आरोग्य केंद्राची उभारणी ग्रामपंचायत मद्ये ठराव करून केली असून त्याला शासनाचा विविध निधी उपलब्ध केलेला आहे .ग्रामस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेले दोन क्रीडांगण,सार्वजनिक आरोग्य केंद्र ,स्मशान भूमी असलेल्या जमिनी सार्वजनिक नागरी हिताच्या सुविधा करीता असल्याने सदरच्या वास्तू असलेल्या १५ एकर जमीन राखून ठेवण्यात यावी.व शासनाने मेट्रो प्रकल्पासाठी या जमिनी ताब्यात घेऊ नये अशी मागणी केली आहे. निळजे आणि निळजेपाडा ह्या दोन्ही गावाच्या ह‌द्दितील जमिनीत उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कार शेड पासून दोन ते अडीज किलो मीटर अंतरावर मेट्रो स्टेशन असणार आहे त्यामुळे आमची जमिनी घेऊनही आम्हाला मेट्रो स्टेशनचा गावाकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही.

राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या म्हाडा, गिरणी कामगाराना घरे, मेट्रो यासारख्या विविध प्रकल्पासाठी कल्याण ग्रामीण मधील भूखंड ताब्यात घेतले जात असल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. हेदुटणे – उसरघर येथे गिरणी कामगारांसाठीच्या घरांचे आरक्षण विरोधात आंदोलन छेडले गेल्यानंतर आता निळजे निळजेपाडा येथील ग्रामस्थ देखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. ग्रामस्थाच्या मुलभूत सुविधासाठीचा भूखंड सोडून प्रकल्प राबवला जावा, जर मुलभूत सुविधावर गदा आणल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |