ठाणे/दिवा ( विनोद वास्कर ) : फेब्रुवारी २०२१ पासून आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान दिवा आगासन, यांच्या मार्फत महिलांना आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी, रांगोळी, पार्लर, महिला साक्षीमिकरण ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे. आगासन गावापासून त्यांनी सुरुवात केली. तर आतापर्यंत त्यांनी सोनारपाडा २ बॅच, डायघरगांव २ बॅच, खार्डीगांव, देसाई साबेगांव, देसाई गाव,निळजेगांव, या सर्व ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
निळजे गांवात २०२,आगासन गावात २१५ महिलांना मोफत मेहंदी, रांगोळी, पार्लर, महिला सक्षमिकरण ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण दिले. सोनारपाडा ४०, डायघर ४०, खार्डी २०,देसाई २०, साबे २०,महिलांना मार्फत दरात आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी, रांगोळी, पार्लर, महिला साक्षीमिकरण ज्वेलरी मेकिंग यांचे प्रशिक्षण दिले. आतापर्यंत ५५७ महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
३ वर्षात उषा मुंडे यांनी ५५७ महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. स्वतः त्या ठिकाणी जाऊन महिलांना प्रशिक्षण देत आहे. आपल्या घरच्या कुटुंबांना मदत कशी होईल आणि संसार चालवण्यासाठी दोन पैसे मिळावे यासाठी हे प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. आतापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या महिला स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. आणि स्वतःचा व्यवसाय आता चालू केला आहे. त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी ही त्या दोन पैशातून मदत होत आहे. आणि घर चालवण्यासाठी ही मदत होत आहे. त्यामुळे घरच्या कुटुंब प्रमुखाला सुद्धा मदत होत आहे. आणि एक समाधानी संसार यामुळे कुटुंबाचा चालत आहे.
उषा मुंडे या अनेक उपक्रम राबवत असतात त्याचमुळे त्यांना नुकताच २०२४ रोजी भारतीय जनता पार्टी कडून नारीशक्ती हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. तसेच भारत मातृभूमी रत्न पुरस्कार २०२३ मध्ये मिळाला आहे. सिंधुताई सपकाळ गौरव पुरस्कार २०२३ मध्ये मिळाला आहे. समाज रत्न हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मनसेकडून २०२३ मध्ये सर्वश्रेष्ठ बचत गट पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. यासाठी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य सोबत असतात. आणि त्यांना सपोर्ट सुद्धा करत असतात.
प्रशिक्षण घेत असताना ज्या महिलांचा वाढदिवस येतो त्यांचा वाढदिवस सुद्धा ते साजरे करत असतात. पंचक्रोशीतील महिला त्यांना उषाताई म्हणतात याच नावाने त्यांची ओळख आता निर्माण झाली आहे. उषा मुंडे ह्या दिव्यांग महिला असून सुद्धा समाजासाठी आणि समाजातील महिलांसाठी समाजसेवा करत आहेत. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी आवाज उठवला आहे. या सर्व कामामुळे त्या नेहमी चर्चेत असतात. भविष्यात ते नगरसेविका सुद्धा होऊ शकतात असं त्यांनी पंचक्रोशीत काम केलं आहे. सध्या त्या कोणत्याही पक्षात नाही. जर त्यांना कोणत्या पक्षाने संधी दिली तर नक्कीच नगरसेविका होऊ शकतात. यात मात्र काही शंका नाही.