डोंबिवली ( शंकर जाधव ) : शासनाच्या निर्देशानुसार *"हर घर तिरंगा" म्हणजेच "घरोघरी तिरंगा"* या अभियानाची अंमलबजावणी महापालिका परिक्षेत्रात सर्वत्र करण्याबाबत आदेश महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, नोडल अधिकारी धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेमार्फत अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये 9 ऑगस्ट रोजी "ऑगस्ट क्रांती" दिनाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील सैन्य, नौदल व वायुदलातील माजी ज्येष्ठ अधिका-यांचा तसेच अग्निशमन दलातील कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कर्मचा-यांच्या आप्तेष्टांचा महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
महापालिका परिक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच पालकांना महापालिकेच्या सहा.आयुक्त व अधिक्षकांमार्फत ध्वज वितरण करण्यात आले. महापालिकेच्या तसेच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत *"तिरंगा प्रतिज्ञा"* घेण्यात आली. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत उद्या दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी *"हर घर तिरंगा"* म्हणजेच *"घरोघरी तिरंगा"* या विषयाबाबत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी शाळा-शाळांतून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.