Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

कोकण श्रमिक संघाच्या माध्यमातून कामगारांना मिळाला न्याय

९ वर्षाच्या प्रदीर्घ लढ्या नंतर कामगारांना मिळाला श्रमाचा मोबदला
उरण दि २६(विठ्ठल ममताबादे ) : ए.पी.एम. टर्मिनल्स इंडिया प्रा.लि. मुंबई गोवा हायवे, सांगुर्ली फाटा, मु. शिरढोण ता. पनवेल जि. रायगड या कंपनीत कंटेंनर दुरुस्ती व देखभाल करण्याचे कामकाज चालत होते. या कंपनीत इंटिग्रिटी मरिन सर्व्हिसेस प्रा.लि. सीबीडी, बेलापूर या नावाने कॉन्ट्रक्टर काम करीत होते. दि.२५/०९/२०१४ रोजी कंत्राटदाराने कामकाज बंद केले. कामगारांना कायदेशिर देणी मिळाली नव्हती. म्हणून कोंकण श्रमिक संघातर्फे ठाणे, औदयोगिक न्यायालय येथे युएलपी ४६/२०१५ तक्रार दाखल केली होती. संघटनेच्या जनरल सेक्रेटरी डॉ. श्रुती म्हात्रे यांनी ९ वर्षे कायदेशिर लढाई केली. ९ वर्षाच्या प्रदिर्घ लढाई नंतर दि.७/०८/२०२४ रोजी सदर प्रकरणात कोर्टात सर्व पक्षामध्ये समझोता घडून आला.

या समझोत्यानुसार प्रत्येक कामगारांला सर्व्हिस नुसार रुपये ९०,०००/- ते ८०,०००/- थकबाकी मिळाली. सदर पेमेंटच्या चेकचे वाटप रविवार दिनांक २५/०८/२०२४ रोजी संघटना कार्यालय येथे जनरल सेक्रेटरी व कामगार नेत्या डॉ. श्रुती म्हात्रे, एकनाथ ठोंबरे व एपीएमचे एचआर हेड योगेश ठाकूर व संपूर्ण कामगारांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. कामगारांना ९ वर्षानी त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळाला. गणपती व श्रीकृष्णाष्टमी या सणाच्या तोडावर कामगारांच्या हातात चेक देताना कामगार आनंदी व समाधानी दिसत होते. कामगारांनी डॉ. श्रुती म्हात्रे, एकनाथ ठोंबरे व योगेश ठाकूर यांचे मनापासून आभार व्यक्त केले व संघटनेला शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |