दिवा ( विनोद वास्कर ) : तुम्हा सर्व नागरिकांना माहीत असेल महाराष्ट्रामध्ये चालू वर्षात अनेक नराधमांनी महिलांवर आणि लहान मुलींवर अत्याचार केले आहेत. हे अत्याचार कमी व्हावे आणि थांबावे यासाठी रोटरी इंटरनॅशनल रोटरी क्लब दिवा ठाणे यांच्या सौजन्य आणि सुभाष भोईर फाउंडेशनच्या सहाय्याने दिव्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यासाठी ओम साई शिक्षण संस्थेचे एस.एम.जी. विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दिवा, सेट मेरी हायस्कूल दिवा, गणेश विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दातिवली या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारचे उपक्रम दिव्यातील सर्व विद्यालयांमध्ये रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणार आहे.याची सुरुवात या शाळेपासून करण्यात आली आहे.
या उपक्रमामध्ये चुकीचा स्पर्श आणि चांगला स्पर्श याबद्दल लहान मुलांना माहिती देण्यात आली तसेच कराटेसारख्या क्रीडा पाकारांच्या स्वसंरक्षणासाठी वापर करता येईल. अशा काही उपाय योजनांची ही माहिती देण्यात आली. कल्याण ग्रामीण मतदार संघातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले सहकार्य तसेच ओम साई शिक्षण संस्थेचे संचालक स्वप्नील गायकर आणि रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे या संस्थेचे अध्यक्ष आदित्य रवींद्र पाटील, युवा शहर अधिकारी दिवा अभिषेक संतोष ठाकूर, सर्व शाळेमधील मुख्याध्यापकांचे आणि सर्व शिक्षकांच्या व इतर सर्वांचे अधिकार्याचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
माजी आमदार सुभाष भोईर म्हणाले की, मी या मातीचा सच्चा भूमिपुत्र आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघातील सर्व शाळा सुरक्षित करणार शिवसेनेची मशाल क्रांती घडवणार!