ठाणे / शिळफाटा ( विनोद वास्कर ) : दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाकडून पिठोरी अमावस्या साजरी करण्यात आली. अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरा रुढी आजही आगरी समाजाने चालू ठेवल्या आहेत. पिठोरी अमावस्या का साजरी केली जाते.
पिठोरी अमावस्या ही हिंदू दिनदर्शिकेनुसार नुसार भाद्रपद आगस्ट व सप्टेंबर महिन्यातील नो चंद्राच्या दिवशी पाली जाते. या पवित्र दिवशी भक्त दुर्गा देवीची पूजा करतात. आणि या अमावस्येला दिवा, ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, अबरनाथ, पनवेल, रायगड, पालघर, मुरबाड, या सर्व विभागातील विवाहित महिला आपल्या मुलाबाळांच्या समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी उपास करतात.
तसेच ज्या घरात पिठोरी हा सण साजरा करतात. त्या घरातील एक व्यक्ती रानामध्ये जाऊन १६ वनस्पती एकत्र गोळा करून टोपलीमध्ये ठेवून रानामध्ये वाहत असलेले नैसर्गिक नाले, तलाव, नदी, या ठिकाणी पाण्याने स्वच्छ धुवून. नदी, नाले, किंवा तलाव याच्यामधून रेती /वाळू काढून टोपलीमध्ये ठेवून पान, सुपारी आणि एक रुपयाचा नाना ठेवून त्या वनस्पतीवर आणि पान सुपारीवर हलत-कुंकू, तांदूळ टाकून, अगरबत्ती लावून, कापूर लावून, आरती बोलून पिठोरी मातीची पूजा करून आपल्या घरी डोक्यावर घेऊन येत असतात. येताना गावाच्या वेशीवर आल्यानंतर हर हर महादेव, हर हर महादेव एकच आवाज गावात घुमत असतो. घराच्या पायरी (पावडी) जवळ आल्यानंतर घरातील एक महिला येऊन त्या व्यक्तीची पिठोरी माता घेऊन आलेल्या व्यक्तीचे पाय धुवून पिठोरी मातेला आरती करून तिला घरामध्ये घेतली जाते. त्यानंतर सायंकाळी पिठोरी मातेची प्रतिमा घराच्या भिंतीवर लावून त्या वनस्पती त्याच्याभोवती सजवून केलेले भोजन नैवेद्य, उखरे लाडू दाखवून पूजा केली जाते.
हर हर महादेव, हर हर महादेव एकाच जल्लोष संध्याकाळी पुन्हा ऐकायला मिळतो. घरातील एक ज्येष्ठ महिला भाताची खीर दिंड्याच्या पानाच्या विडामध्ये भरून हातात घेऊन पिठोरी माते जवळ बसून डोक्यावर घेऊन माझा वरात चालवशील का? अशी ती बोलते, तिच्या पाठीमागे असलेले व्यक्ती दिंड्याच्या पानाचा विडा भरलेले खीर हातात घेऊन म्हणतात. हो मी तुझा वरात चालवणार.अशी ही परंपरा पिठोरी मातेच्या आशीर्वादाने चालू आहे. त्यानंतर सर्वजण पिठोरी मातेचे दर्शन घेतात. त्यानंतर घरातील बनवलेले भोजन सर्वांना जेवणासाठी दिले जाते. असा हा सण साजरा केला जातो. ज्या घरामध्ये गणपती येतो अशा घरांमध्ये पिठोरीचे पूजन होत असते. बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य असतो. या अमावस्येला पिठापासून बनवलेल्या देवीची मूर्तीची पूजाही केली जाते. त्यामुळे या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. तसे हे व्रत श्रावण अमावस्येच्या दिवशी सकाळपासून केले जाते. आणि सायंकाळी हे सोडले जाते. पिठोरी अमावस्या शुभ आहे. कारण पिठोरी अमावस्येला स्त्रिया संततीसाठी हे वत करत असतात असे मानले जाते.
देवी पार्वतीने या व्रताचे महत्व सर्वांसोबत शेअर केले. आणि या व्रताचे शुभ परिणाम आणि त्या व्रताचे पालन केल्याने येणारे इच्छा पूर्ण होणारे रहस्य सर्वांना सांगितले.
शहरी भागासाठी या १६ वनस्पती एकत्र करून पिठोरी मातेचे पात्री आदिवासी समाजातील महिला पुरुष विकण्यासाठी शहरात जातात त्यामुळे त्यांना दोन पैसे मिळतात.
पिठोरी मातीची पूजा करण्यासाठी त्यां १६ वनस्पती कोणत्या आणि त्यांचे प्रमाण किती तर त्या १६ वनस्पतींची नावे वडाच्या झाडाची १६ पाने असलेल्या दोन फांद्या, कुडा १६ पाने असलेल्या दोन फांद्या, रान घुंगरू, दिंड्याची पाने दोन, हळदीचं फुल दोन, गोमेटावेल दोन, तेरडा दोन, कलईवेल दोन, मंजिरी, लव्हे १६ च्या दोन जुड्या, नारळी वेल दोन, सुंदरली वेल दोन, गाभोली, बेलपत्र, अक्षता, रेती,वाळु तिळ, हातामध्ये १६ गाठी मारलेला लव्हेचा कडा, बोटामध्ये १६ गाठीच्या दुर्व्याची अंगुठी असा हा पारंपारिक पानाफुलांचा देव आणि घरातील महिला पिठापासून तयार करतात १६- १६ दोन माळ, केळी एक डझन, पेटी, कोल्हा, आंबा, चिंच, चामट्या १६ या सर्व पिठापासून तयार करतात. हे सर्व सायंकाळी रानातून आलेल्या पानफुलांची पात्री आणि घरात बनवलेल्या पिठाच्या पदार्थ सजवून सायंकाळी पूजा करून घरात बनवलेले नैवेद्य पिठोरी मातेला दाखवले जाते. पिठोरी मातेला ६४ मुल झाली होती. दर पिठोरी अमावस्येला तिला मुलं होत होती. तिच्या सासरयाला राग आला आणि त्याने पिठोरी मातेला रागात जंगलात पाठवून दिले. सोबत तिच्या मुलांना आणि नवऱ्याला सुद्धा यानंतर सासर्याला बरबादी लागली. साक्षात्कार देवीलाच तिच्या सासऱ्याने हाकलून दिल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला. ही सर्व माहिती जेव्हा नागरिकांना मिळाली तेव्हापासून दर पिठोरी अमावस्येला नागरिक आपल्या घरी आणतात आणि मोठ्या उत्साहात पिठोरी अमावस्या हा सण साजरे करतात.