Type Here to Get Search Results !

कुत्र्याच्या पोटातून काढला 2 किलो 100 ग्रॅमचा काढला ट्युमर


डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण पूर्व येथे एक वयस्कर भटकी श्वान आजारी अवस्थेत फिरत होती. नागरिकांनी जेंव्हा पॉज हेल्पलाईन ला फोन केला. तेव्हा संस्थेने रुग्णवाहिका पाठवून त्या श्वानास वाचवले. ती खूप मोठा ट्यूमर पोटाखाली घेऊन फिरत होती. पॉज संस्थेचे पशुवैद्यक सर्जन डॉक्टर नितीश पुरो ह्यांनी आज सुमारे 2 तास मोठी शस्त्रक्रिया करून सुमारे 2 किलो 100 ग्राम वजनाचा मोठा ट्यूमर त्या श्वानपासून अलग केला व तिला ह्या यातनेतून वाचवले.

पॉज ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी रजिस्टर्ड संस्था असल्याने तिथे अनुभवी स्टाफ आणि डॉक्टर तर्फे निष्णात उपचार केले जातात, त्या श्वानाचे नाव ब्रुनेई असे ठेवले.

आतापर्यंत केलेल्या शस्त्रक्रिया मध्ये हा सर्वांत मोठा ट्युमर काढला गेला आहे असे संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे ह्यांनी सांगितले.पॉज संस्थेने आतापर्यंत सुमारे दोन हजार तीनशेच्या वर मोकाट जनावरांच्या अवघड शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत असे सचिव अनुराधा रामस्वामी ह्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies