डोंबिवली ( शंकर जाधव ) : श्री गावदेवी मंदिर देवस्थान ( आयरे ) जय अंबिका भक्त मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सवात देवीची पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष विजय पाटील,कार्याध्यक्ष नितीन पाटील,उपाध्यक्ष सचिन केणे,सचिव रवि पाटील, खजिनदार विलास मढवी यांसह सुदर्शन म्हात्रे, दिनेश म्हात्रे, दिनेश पाटील, मोहन भगत, भरत पाटील, गोविंद टावरे, डॉ. शोभा पाटील, श्वेता पाटील, तुकाराम केणे, भगवान पाटील, सुधाकर म्हात्रे, द्वारकानाथ भगत, गुरुनाथ पाटील, मनिष म्हात्रे, किशोर पाटील, राहुल भगत, पल्लवी मढवी, सल्लागार महंत बाळकृष्ण पाटील, माजी खासदार जगन्नाथ पाटील, ऍड. रामप्रकाश नायर, ऍड. सुवर्णा पावशे, ऍड. अरविंद म्हात्रे यासह अनेकजण उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. देवींची पालखी सोहळ्यात सर्व गावकरी सहभागी झाले होते. मंदिरात महाआरती करण्यात आली होती.