डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी विधानसभेत 27 गाव, 14 गाव आणि दिवा शहरातील पाणी समस्या मांडली होती. डोंबिवली एमआयडीसीतील घातक रासायनिक केमिकल कारखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही कारवाई होत नाही, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व विषारी धूर व गॅस सोडणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार राजेश मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,डोंबिवली एमआयडीसी मधील घातक रासायनिक कारखाने हे रात्रीच्या वेळी व पहाटेच्या वेळी मोठमोठ्या चिमण्याद्वारे रासायनिक गॅस आणि घातक धूर हवेत सोडला जातो.अनेक घातक केमिकल्स कारखान्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता वापरली जातात.अनेक वेळेला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई या कारखान्यांवर केली जात नाही.या अतिविषारी घातक धुरामुळे व गॅसमुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.आपणांस विंनती आहें की, या विषारी धूर व गॅस सोडणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर कडक कारवाई करावी व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या मेट्रो व म्हाडा अंतर्गत होत असलेल्या -घरकुल योजना या सारख्या वेगवान विकास प्रकल्पांसोबत 27 गावातील स्थानिक ग्रामस्थ मंडळ यांच्या मागणी नुसार गावा गावातील मूलभूत गरजा लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाव सुशोभीकरण, स्मशान भूमी बांधकाम, उद्यान उभारणी यावर विकास कामांवर देखील शासनाने लक्ष केंद्रित करावे असे कल्याण ग्रामीण विधासभा मतदार संघांचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी विधानसभेत केली.