जम्मु काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात २ दिवसापूर्वी लष्कराचं वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवान ठार झाले. त्यातील 2 सैनिक हे महाराष्ट्रातील आहेत. त्या दोघांच्या वारसांना राज्य सरकार च्या वतीनं १ कोटी रुपये आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातील कामेरी या गावातील असून, सिपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव इथले रहिवासी आहेत.