उबाठा, मनसे पाठोपाठ दिवा शहरात भाजपलाही धक्का
दिवा ( प्रतिनिधी ) : दिवा शहरात शिवसेनेच्या वतीने दिवा महोत्सव सुरू आहे. दिवेकरांच्या प्रचंड प्रतिसादात सुरू असलेला दिवा महोत्सव यंदा मात्र जाहीर पक्ष प्रवेशांमुळे चांगलाच चर्चेला आला आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत उबाठाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला त्यानंतर तिसऱ्या दिवशी शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या हस्ते मनसेच्या विभाग अध्यक्ष यांच्या समवेत शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि रविवारी भाजपचे दिवा मंडळ सरचिटणीस, कट्टर व जुने भाजप कार्यकर्ते युवराज यादव यांनी शिवसेना प्रवक्ते, खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, मा. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसहित शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली दिव्याचा विकास झपाट्याने झाला आहे. पूर्वीचा दिवा आणि आत्ताचा दिवा यामध्ये खूप फरक दिसतो, जो शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाला आहे. दिवावसियांच्या पाठीशी भक्कपणे उभ्या असणाऱ्या आणि कार्यकर्त्याचा योग्य सन्मान ठेवणाऱ्या पक्षात प्रवेश करत असताना खुप आनंद होत असल्याचे युवराज यादव यांनी सांगितले.