ठाणे : दि.19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत “सुशासन सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.
यासंबंधी मा.डॉ. तुषाबा शिंदे, संचालक, भारत सरकार यांनी शनिवार, दि.21 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित बैठकीत "सुशासन सप्ताह" अंमलबजावणीचा आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देवून श्री.शिंदे यांचे स्वागत केले. याप्रसंगी तहसिलदार किशोर मराठे, उमेश पाटील व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत विविध शासकीय विभाग/कार्यालयाकडून शिबिरे आयोजित करून, देण्यात येणाऱ्या विविध सेवा, प्राप्त/ प्रलंबित तक्रारी अर्जावर कार्यवाही करून, जलदगतीने निपटारा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.