विरोधकांनी राज्यसभा सभापतींविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव दुर्दैवी असून, जॉर्ज सोरोस प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी, हे पाऊल उचललं असल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी केला आहे. सभापती आणि उपराष्ट्रपती धनखड अत्यंत शिस्त आणि न्यायानं सभागृह चालवतात, मात्र विरोधकांना केवळ गदारोळ करण्यात रस आहे, असं रिजिजू म्हणाले.
संसदेत रालोआकडे बहुमत आहे आणि आम्ही धनखड यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, विरोधकांनी सोरोस प्रकरणावर उत्तर दयावी अशी आमची अपेक्षा आहे. खरं तर इतर विरोधीपक्षांनाही विविध विषय मांडण्यात रस आहे. मात्र, कॉग्रेस केवळ आपल्या हिताचा विचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या धनखड यांना लक्ष केलं जात आहे, असं ते म्हणाले.