पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी साडेचार वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४ च्या महाअंतिम फेरीत तरुण नवोन्मेषांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधणार आहेत. यात १ हजार ३०० हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. सातवं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ११ डिसेंबरला देशभरातल्या ५१ नोडल केंद्रांवर एकाच वेळी सुरू होईल.
आरोग्यसेवा, पुरवठा साखळी आणि वाहतूक , स्मार्ट तंत्रज्ञान, वारसा आणि संस्कृती, शाश्वतता, शिक्षण आणि कौशल्य विकास, पाणी, कृषी आणि अन्न, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन, यावर हॅकेथॉनमधे काम केलं जाईल. यावर्षी, ५४ मंत्रालयं, विविध विभाग, राज्य सरकारं, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांनी २५० हून अधिक समस्यांबाबत सादरीकरण केलं आहे. संस्था स्तरावर अंतर्गत हॅकथॉनमध्ये १५०% वाढ नोंदवली गेली आहे. संस्था स्तरावर स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४ मध्ये ८६ हजारांहून अधिक संघ सहभागी झाले आहेत.