ठाणे, दि.30 :- वर्षा ज्ञानेश्वर वळवी (वय 25 वर्षे, रा. रामनगर, पाटील चाळ, रोड नं.28, शिवसेना शाखेच्या मागे, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम) ही महिला हरविल्याची नोंद ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
हरविलेल्या महिलेचे वर्णन :- अंगाने मध्यम, रंग गोरा, चेहरा गोल, केस काळे व मानेपर्यंत, डोळे काळे, नाक सरळ, अंगात काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात काळ्या रंगाची चप्पल, हातात आकाशी/पांढऱ्या रंगाची काखेची बॅग, डाव्या हातावर पोटरीखाली ज्ञानु असा इंग्रजीत टॅटू गोंदलेला असून मराठी व हिंदी भाषा बोलते.
वरील वर्णनाची महिला जर कोणास आढळल्यास तर त्यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जी.व्ही.साळेकर यांनी केले आहे.