दिवा : दिवा शहरात सुरू असलेल्या १६व्या दिवा महोत्सवात काल नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन व शिवसेना शहरप्रमुख, मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ऊबाठा गटातील विभागप्रमुख मच्छिंद्र लाड यांच्या सहित सहा शाखाप्रमुख, महिला विभागसंघटिका यांच्या सहित २०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
दिवा शहरात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, दिवा रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला आहे. मृत्यूचा सापळा ठरलेली रेल्वे क्रॉसिंग बंद झाल्यामुळे शेकडो दिवेकरांचे प्राण वाचले आहेत. शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या विकासाच्या दूरदृष्टी वर प्रभावित होऊन काल उबाठाचे विभागप्रमुख मच्छिंद्र लाड, उपविभागप्रमुख दिनेश कळमकर, विजय कोटकर, शाखाप्रमुख विजय चांदोरकर, शाखाप्रमुख देवीदास तटकरे, शाखाप्रमुख किरण साळुंखे, शाखाप्रमुख अमित गुप्ता, शाखाप्रमुख परीक्षित पानसरे, शाखाप्रमुख गणेश चव्हाण, महिला उपविभाग संघटिका रोहिणी निकम, शाखा संघटिका कल्पना कळमकर, शाखा संघटिका राजश्री अहिवळे, शाखा संघटिका अक्षता राउल, शाखा संघटिका सुशीला रसाळ, शाखा संघटिका मीनाकुमारी गुप्ता, शाखा संघटिका वैशाली पवार, यांच्या सोबत अनेक उपशाखाप्रमुख, उपशाखासंघटिका, गटप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.