ठाणे,दि.14 :- 26 जानेवारी 2025, प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने आणि उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीत संबधित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी संपर्क अधिकारी नेमणे, मुख्य कार्यक्रमस्थळी पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान येथील मैदान स्वच्छता करणे, मैदानावर पाणी मारुन घेणे, मोबाईल टॉयलेटची व्यवस्थाकरणे, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात व क्रीडा संकुलनात झेंडा दोरी बांधणेकामी अनुभवी पोलीस कॉन्स्टेबल पाठविणे, बँड पथक पाठविणे,स्टेजवर व स्टेज जवळ पोडीयमची व्यवस्था करणे व प्लॉटून्सची यादी व बक्षिसप्राप्त अधिकारी / कर्मचारी यांची यादी तयारी करणे, रंगीत तालीम संचलन करणे,मंत्री,महोदय व इतर मान्यवर, प्रतिष्ठीत नागरिक, अधिकारी/कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक यादी तयार करणे,मंडप व ध्वनीक्षेपणक व जनरेटरची व ध्वज स्टेज, बक्षिसप्राप्त विद्यार्थ्यीची,क्रीडापटू व उद्योजकांची यादी दोन दिवस पूर्वी देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत ठाणे महानगरपालिका, पोलीस आयुक्त, ठाणे, पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा शल्यचिकित्सक, उपविभागीय अधिकारी ठाणे व तहसिलदार ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, समादेशक होमगार्ड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, ठाणे, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक, जिल्हा परिषद व मनपा शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, स्काऊट व गाईड कमिशनर, उपनियंत्रक नागरी सरंक्षण दल, अग्निशमन दल ठाणे महानगरपालिका आदी विभाग उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी संबधित सर्व विभागास ध्वजारोहण वेळेचे महत्व, परेड, सूत्रसंचालन, मंडप फिटनेसबाबत दक्ष राहावे, वाहन पार्कीग, पालकमंत्री, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, राजकीय नेतेमंडळी, सकाळी ऊन्हापासून संरक्षणासाठी व बैठक व्यवस्था, बक्षिस वाटप करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यादीबाबत समन्वय करुन ग्रुप करुन आढाव घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास सूचित केले. तसेच मागील अनुभव पाहता संबधित विभागाने काळजी घेणे गरजेचे आहे. नाविण्यपूर्ण काही उपक्रम असल्यास संबधित विभागाने या कार्यालयास कळविण्याचे आवाहनही केले.
येत्या 24 जानेवारी रोजी संबधित विभागाने रंगीत तालीम करण्यासाठी वेळेत उपस्थित रहावे. तसेच बक्षिस वितरणाची यादी कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर या कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात यावी. पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक कार्यालयांनी याबाबत नियोजन करावे. त्याचप्रमाणे परेड बँड पथक, वाहने व तसेच आरटीओ विभाग, होमगार्ड विभाग, नागरी सरंक्षण दल, सागरी दल यांना परेडमध्ये समावेश करण्याकरीता सूचना केली. तसेच बेडेकर कॉलेज व इतर एनसीसी शालेय विद्यार्थ्यांचा परेडसाठी समावेश होण्याकरिता शिक्षण विभागास सूचना दिल्या. महानगरपलिका विभागास कार्यक्रमस्थळी भटक्या कुत्र्यांचा वावर होत असेल तेथे अटकाव करण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.