उत्तर भारतात थंडीचा प्रकोप सुरूच आहे. अनेक ठिकाणी पाऱ्यात घसरण झाली आहे. ४ जानेवारीपासून पर्वतीय भागात पावसासह बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे.
तर पटना इथं शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तामिळनाडूत चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.