डोंबिवली ( शंकर जाधव ) रिक्षातून प्रवास करता असताना उतरताना सोन्याचे दागिने असलेली बँग विसरल्याने महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात कळविले होते. ही घटना बुधवार 1 तारखेला सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिर मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्टेशनदरम्यान घडली. पोलिसांनी याचा तपास करत सोन्याचे दागिने ठेवलेली बँग शोधून महिलेच्या स्वाधीन केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी अजय किर्पेकर या सोमवार 1 तारखेला गणपती मंदिर मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्टेशन असे रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरले. बॅगेमध्ये 22 तोळे 400 मिली. एकूण रुपये 16,35,000 रुपये किमतीचे दागिने व कपडे होते.विष्णूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे, पोलिस अंमलदार मंगेश वीर यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कक्षातून सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या रिक्षाचा नंबर शोधला.रिक्षा मालकाच्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी सद बँग घेतली.
या बॅगेतील सोन्याचे दागिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी महिलेला दिले.पोलिसांचा या कामगिरीबद्दल महिलेने आभार मानले.