ठाणे ( विनोद वास्कर ) : आई गावदेवी रिक्षा चालक-मालक संघटना खार्डी - फडके पाडा यांच्यातर्फे ७ जानेवारी २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा गावदेवी मंदिर खार्डी फडके पाडा येथे आयोजित केली होती. आई गावदेवी आणि श्री सत्यनारायणाची पूजा ५ जोडप्यांनी केली. पूजा ही ३ ते ५ वाजेपर्यंत करण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा लाभ ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत होते. महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील १५०० भाविकांनी घेतला. यंदाचा वर्ष हे ३ रे होते. सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत गावदेवी हरिपाठ महिला मंडळ खाडी यांनी हरिपाठ सादर केले. ७ ते ८ शिवशक्ती गायन पार्टी खार्डी, गायक : जयवंत पाटील, रुपेश पाटील व इतर मंडळी यांनी देवीचे गाणी सादर केले.८ ते ११:३० वाजेपर्यंत निखिल पाटील प्रस्तुत आर्केस्ट्रा आम्ही बाळकुमकर स्वर संध्या संगीत कार्यक्रम धमाल भक्तीगीत लोकगीत कोळी गीत ऑर्केस्ट्राचेही आयोजन केले होते.
खास करून सर्व रिक्षा चालकांनी पांढरा पोशाख परिधान केला होता आणि डोक्यावर पांढरी टोपी होती. रिक्षा चालक हा आपल्या रिक्षातून प्रवासी घेऊन जात असतो. वर्षभर आई गावदेवी आणि सत्यनारायणाच्या आशीर्वाद सर्व रिक्षा चालकांवर असावा. आणि येणाऱ्या संकटापासून रक्षण व्हावे यासाठी २०० आई गावदेवी रिक्षा चालक एकत्र येऊन ही सत्यनारायणाची पूजा करत असतात. स्वतः रिक्षा चालक वर्गणी काढून श्री सत्यनारायणाची महापूजा करत असतात. सकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत संघटनेचे सर्व रिक्षा चालक काम करत असतात. येणाऱ्या भाविकांचे सुद्धा स्वागत करत असतात. १५०० शे भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात हा एक वेगळाच आनंद त्यांना पहायला मिळत असतो. या महापूजेची चर्चा पंचक्रोशीत होत असते.