दिवा : शहरातील अनधिकृत शाळा कायम स्वरुपी बंद करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शहरप्रमुख सचिन पाटील ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी श्री. मेहेत्रे ह्यांना निवेदन देण्यात आले.
ह्या निवेदनात दिवा शहरातील अनधिकृत शाळा तसेच त्या शाळाचे संस्थाचालक ह्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. ही प्रमुख मागणी प्रशासनाकडे करण्यात आली केली आहे. ह्या अनधिकृत शाळा मध्ये शिक्षणाचा दर्जा योग्य नसल्यामुळे मुलाच्या भविष्याचे नुसकान होत आहे.
ह्या अनधिकृत शाळ लवकरात लवकर कारवाई केली नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर प्रमुख सचिन पाटील यांनी दिला. सोबत महिला शहर संघटीका ज्योती पाटील उपस्थित होत्या.