Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS
‘NQAS certified PHC’ व जिल्ह्यात मोबाईल मेडिकल युनिट चे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचा सत्कारठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती, सर्वांगीण सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे‘वेव्हज्’मध्ये शुक्रवारी जागतिक माध्यम संवादासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीमहाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेरोहिदास मुंडे यांना आपलं महानगर-माय महानगर ठाणे आयकॉन 2025 पुरस्काराने सन्मानित२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय‘NQAS certified PHC’ व जिल्ह्यात मोबाईल मेडिकल युनिट चे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचा सत्कारठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती, सर्वांगीण सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे‘वेव्हज्’मध्ये शुक्रवारी जागतिक माध्यम संवादासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीमहाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेरोहिदास मुंडे यांना आपलं महानगर-माय महानगर ठाणे आयकॉन 2025 पुरस्काराने सन्मानित२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

शिळगांव अखंड हरिनाम सप्ताहाची मोठया भक्तिमय वातावरणात सांगता

ठाणे /शिळफाटा ( विनोद वास्कर ) : शिळगावातील वेशी आई मदिरा च्या ठिकाणी हरिनाम कीर्तन सोहळ्याला २७ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरूवात झाली.या हरिनाम कीर्तन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय, भावीक, भक्त आणि ग्रामस्थ दररोज १५०० च्या वर संख्येने उपस्थित राहत होते.
पहिल्या दिवशी वेशी आई आणि श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. ३ दिवस दररोज सायंकाळी ७ ते ९ महाराजांचे कीर्तन झाले. भजन, पवचन हरिपाठ, हे सुद्धा झाले. २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४:०० वेशी आई मंदिरापासून दिंडीला सुरुवात झाली.या दिंडीला महिलांनी ज्ञानेश्वरी पारायण, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन हातात ताळ बाळ गोपाळ यांच्यासह भाविक वारकरी ग्रामस्थ शामिल होते.
हरिपाठ ,टाळ, मृदंगाच्या तालावर महिला पुरुष फुगड्या सुद्धा खेळत होत्या. तसेच नाचत सुद्धा होत्या. असं वाटत होतं शिळगावात पंढरपूर अवतरली असं वाटत होतं. हरिनामाचा गजर होत शिळगाव दुमदुमली. ज्ञानेश्वर माऊली, नामदेव माऊली, हा एकच आवाज कानी पडत होता. पालखी हनुमान मंदिर, पुढे गेल्यानंतर भवानी चौकात रिंगण झाले. त्यानंतर महाकालेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर, सर्व ठिकाणातून पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गावाला पूर्ण प्रदक्षिणा झाल्यानंतर पुन्हा वेशी आई मंदिराच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिंडीची समाप्ती झाली.
पहिल्या दिवशी सोमवारी २७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह.भ.प. सुभाष महाराज पाटील (नागोठणे ) यांचे कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह.भ.प.डॉ.नाना महाराज कदम ( बंकट स्वामी संस्थान नेकनूर -बीड) यांचं कीर्तन झाले. तिसऱ्या दिवशी बुधवारी दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता काल्याचे सुश्राव्य किर्तन : ह भ. प. गुरुवर्य साळाराम महाराज यांचे नातू ह. भ. प.चेतन महाराज म्हात्रे ( कोपर डोंबिवली ) अध्यक्ष :वारकरी सं.प्र.मंडळ ठाणे - रायगड यांचे १२:३० वाजेपर्यंत कीर्तन झाले.खास करून या कालच्या कीर्तना हाशा रामा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे (शिळगांव)विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, मुख्याध्यापक ,शिक्षक सुद्धा उपस्थित होते. 
श्रीकृष्ण, गणपती, सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी असे अनेक रूपधारण करून आणि पोशाख परिधान करून विद्यार्थी कीर्तनाला आले होते. लहान वयातच विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती, कला, रुढी, परंपरा देव देवतांची मिळाली तर त्यांच्यावर चांगले सत्कार होतात. कीर्तनाची समाप्ती झाल्यानंतर दहीहंडी कार्यक्रम झाला. आलेल्या सर्व वारकरी संप्रदाय, भावीक भक्त विद्यार्थी यांना मानव सेवा प्रतिष्ठान कडून १५०० पेन वाटण्यात आले. यानंतर या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची महाप्रसाद महापंगत बसवण्यात आली तब्बल तीन दिवस रात्रविना पूजा अर्चना सेवा अखंडित चालू होती.
 या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोहळ्याप्रसंगी शिळगांव कल्याण फाटा भोलेनाथ नगर, शिळठाकूर पाडा सह फडकेपाडा,खार्डी, कौसा,डायघर, उत्तरशिव, देसाई, मोठी देसाई, पडले, खिडकाळी, भंडार्,ली मोकाशी पाडा, दहिसर, दहिसर मोरी, पिंपरी, नेवाळी, नागांव, वाकळण,बामाली, निघू, नारिवली, घेसर, निळजे, कोळे, काटई, हेदुटणे, खोणी, मानपाडा, संदप, बेतवडे, दातिवली, म्हाताडी, आगासन, दिवा, साबे व सामुदायिक हरिपाठ मंडळ २६ गावेकर एकादशी ग्रुप, सह परिसरातील विविध गाव वाड्या वस्त्यांमधून वारकरी संप्रदाय ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा चरणी तीन दिवस मोठ्या उत्साहात हरिनाम कीर्तन सोहळा शिळगावात साजरा झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |