कल्याण ( संजय कांबळे) : मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हसोबा अर्थात खांबलिंगेश्वर यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना याकरिता प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शिवाय नवीन आलेल्या एच एम पीव्ही विषाणू च्या धर्तीवर येणाऱ्या यात्रेकरूंनी काळजी घेण्याचे अवाहन मुरबाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री लोहकरे यांनी केले आहे.
तालुक्यातील म्हसा यात्रेला १५०ते २००वर्षाची पंरपरा आहेयेत्या१३जानेवारी पासून ही यात्रा सुरू होत आहे., याकरिता संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील, छोटे मोठे व्यापारी, यात्रेकरू येत असतात, राज्यातील एकमेव ही यात्रा भरते, जी १०ते १५दिवस चालते, लाखोंचा जनसमुदाय येथे येत असतो, यामुळे येथील ग्रामपंचायत, पंचायत समिती, पशुसंवर्धन, बांधकाम, महसूल आणि पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण येतो. त्यामुळे हे दूर करण्यासाठी येथील आमदार किसन कथोरे यांनी काही दिवस अगोदरच सर्व विभागांची बैठक घेऊन नियोजन केले आहे.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, बैलबाजार, घोंगडी बाजार,संसार उपयोगी साहित्य, खेळणी पाळणे, लोककला, मनोरंजन, आदी मुळे ही यात्रा अनेक दिवस चालते.
या बाबतीत नियोजन करताना प्रशासनाची दमछाक होते, तरीही मुरबाड पंचायत समिती व म्हसा ग्रामपंचायत यांच्या वतीने ८टिम तयार करण्यात आल्या आहेत, प्रत्येक टिम मध्ये ३/३ अशी २५कर्मचारी नेमणूक केली आहे,एक टिम रिजर्व ठेवण्यात येणार आहे, यासाठी ३ग्रामसेवक, यावर देखरेख करणार आहेत, यांना वेग वेगळा एरिया(विभाग)दिला आहे. १०शौचालये, रुग्णवाहिका, पुरेसा औषध साठा,२४तास आरोग्य कक्ष, पुरेसा टिसीएल साठा, धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टँकर ची सोय, पाणी शुध्दीकरण, कचरा, इत्यादी विषय त्या त्या विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच अंत्यत महत्त्वाचे म्हणजे, सध्या राज्यात नवीन आलेल्या एच एम पीव्ही विषाणू ची भिती पसरली आहे, हा तितका भंयकर नसला तरी, येणाऱ्या यात्रेकरूंनी मास्क वापरले, स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत श्री लोहकरे यांनी व्यक्त केले आहे.
तसेच यात्रेकरीता येणारे लाखो लोक आणि त्या मानाने मनुष्यबळ कमी त्यामुळे प्रशासनावर ताण येणार असेही ते म्हणाले,त्यामुळे येणाऱ्या भावीकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करून म्हसा यात्रेचे पावित्र्य राखावे असे अवाहन प्रशासनाने केले आहे.