नागपुर : अराजकवादी शक्तींच्या विरोधात राष्ट्रीय विचारांची शक्ती संपूर्ण ताकदीनं उभी राहिल्यानं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठं यश मिळालं, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
ते काल नागपुरात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक विलास फडणवीस यांच्या जयंती निमित्त आयोजित जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रकट मुलाखत देतांना बोलत होते. विरोधकांच्या फेक नॅरेटिव्ह ला संपवणारी नियमित राजकारण करणारी शक्ती नसून नियमित राष्ट्रकारण करणारी शक्ती होती. असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आपल्याला महाराष्ट्रात आपली राजकीय संस्कृती परत आणायची आहे. त्यामुळे बदल घडवणारं राजकारण करायचं आहे सूडाचं राजकारण करायचं नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 2 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संघाचे अनेक स्वयंसेवक, भाजप नेते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.