Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे अंतर्गत परिमंडळ-३, कल्याण मध्ये मुददेमाल हस्तांतरण व 'सीएमआयएस' ऍप चे अनावरण..


कल्याण : महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापनेचे औचित्य साधुन दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२५ दरम्यान 'पोलीस रेझिंग डे सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक ०८/०१/२०२५ रोजी १६.०० ते १९.०० वाजेच्या दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील साई नंदन हॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती, वल्लीपीर रोड, कल्याण पश्चिम येथे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने परिमंडळ-३, कल्याण अंतर्गत "मुददेमाल हस्तांतरण व सीएमआयएस ऍप चे अनावरण" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात श्री.अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३, कल्याण यांच्या प्रास्ताविक भाषणाने होऊन त्यांनी उपस्थित असलेल्यांना 'रेझिंग डे' कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश समजावून सांगितला. तदनंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर व श्री. संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी नागरिकांनी चोरी करणाऱ्यांपासून आपण कशी सावधगिरी बाळगली पाहिजे याबाबत उत्तम मार्गदर्शन केले.


कल्याण पोलीस परिमंडळ-३ क्षेत्रात येणाऱ्या महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळशेवाडी, खडकपाडा, डोंबिवली, विष्णूनगर, मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीला गेलेला एकूण १६२ लोकांना रुपये १,४३,३७,८१०/- असा सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. त्यात रुपये ६४,९५,८१०/- सोन्याचांदीचे दागिने, रुपये ४९,७१,०००/- वाहने, रुपये १५,९३,०००/- मोबाईल, रुपये १२,७८,०००/- रोख रक्कम असा तपशील असून नागरिकांकडून पोलीसांचे आभार व्यक्त केले जात आहे. तसेच पत्रकारांकडून देखील पोलीसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रसार माध्यमाद्वारे बातमी प्रसारित करण्यात येतात म्हणून उपस्थित पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

सदरचा कार्यक्रम शांततेत पार पडला असून कार्यक्रमाचे ठिकाणी ५०० ते ५३० जनसमुदाय उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |