इगतपुरी : स्वानंद सुखनिवासी श्री सद्गुरु सावळारामबाबा महाराज म्हात्रे यांचा ३३ वा पुण्यतिथी सोहळा तळोघ येथे संपन्न होणार आहे.
सद्गुरु सावळाराम महाराज यांनी आपल्या कीर्तनातून संतांचे मानव कल्याणाचे विचार सांगत. ईश्वर भक्ती-आराधनेबाबत प्रबोधन केले . शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलींचे शिक्षण याबाबत त्यांची आग्रही भूमिका राहिली. महाराजांच्या या प्रयत्नांनी समाज सुशिक्षित होत गेला. त्यांच्यामुळे आज अनेक मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आयपीएस अधिकारी, प्रवचनकार, कीर्तनकार आहेत. आळंदी-पंढरपूर या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांची निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी महाराजांनी लोकसहभागातून भव्य-दिव्य अशा धर्मशाळा उभारल्या. ढोके-श्रीमलंग येथे त्याकाळी दुर्गम असलेल्या भागात राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी एक विद्यालयदेखील उभारले. तसेच डोंबिवली शहरात अगदी मध्यवर्ती भागात वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ, डोंबिवली’ या संस्थेची स्थापना केली. तिथे त्यांनी लोकसहभागातून श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर उभारले.
श्री सद्गुरु सावळारामबाबा महाराज म्हात्रे यांचा ३३ वा पुण्यतिथी सोहळा तळोघ, ता. इगतपुरी जि. नाशिक संपन्न होणार आहे. त्या निमित्त बुधवार दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी, सकाळी ११ ते १ वा. ह.भ.प.श्री. हनुमान महाराज कोळेगाव ( डोंबिवली) किर्तन होणार आहे. त्यानंतर वै.सावळाराम बाबा म्हात्रे यांच्या प्रतिमेला पुष्पवृष्टी होवुन नंतर महाप्रसाद देण्यात येईल
सदर कार्यक्रमाची संकल्पना कमलाकर मुंडे, आगासन दिवा यांनी आयोजली असून जास्तीत जास्त वारकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.