Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पीएम-आशा या योजनेच्या अंमलबजावणीला केंद्र सरकारची मंजुरी

प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान म्हणजेच पीएम-आशा या योजनेच्या अंमलबजावणीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पुढची ४ वर्षं शेतकऱ्यांकडून तूर, उडीद आणि मसुरची शंभर टक्के खरेदी करणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतीच यंदाच्या खरीप हंगामासाठी किमान हमी भावानं महाराष्ट्रासह ९ राज्यात तूर खरेदीला मंजुरी दिली होती. आतापर्यंत १२ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना तूर खरेदीचा लाभ झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |